पुणे जिल्हा प्रतिनिधी. रफीक शेख.
लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद
दि.२०/११/२०२५ रोजी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल पंपाचे ऑफिसमध्ये जबदरस्तीने प्रवेश करुन फिर्यादी व इतरांना कोंडुन ठेवून धमकावुन जबरी चोरी केलेबाबत लष्कर पो. स्टे गुन्हा रजि नं १९५/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०९, (५) १२७ (२) ३५१ (२) ३(५) अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हे शाखा युनिट २ कडून सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु होता.
दि.०८/१२/२०२५ रोजी सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना पोलीस अंमलदार आजीम शेख व सददाम तांबोळी यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने सदर गुन्हयातील संशयित पाहिजे आरोपी हा लोहियानगर गंजपेठ पुणे येथे असलेबाबत गोपनिय माहिती मिळाली. सदर माहिती युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांनी कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने इसम नामे जाहिद कमरुदीन शेख वय २० वर्ष रा. लोहियानगर ५४ ए.पी पुणे यास ताब्यात घेवून लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हयाचे कामी हजर करण्यात आले असुन नमुद आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांचे सुंचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार संजय जाधव, विनोद चव्हाण, शंकर नेवसे, नागनाथ राख, संदिप शिर्के, विशाल दळवी, विजयकुमार पवार, संजय टकले, शंकर कुंभार, संजय आबनावे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, योगेश मांढरे, सर्जेराव सरगर, सददाम तांबोळी, अजीम शेख या पथकाने केली आहे.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















