अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची फरासखाना पोलीस ठाणे हद्दीत कारवाई १२,१२,३६०/- रू किंचे ५९.४०० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ
पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या सुचनेप्रमाणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन १४/०६/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, मपोउपनि अस्मिता लाड व स्टाफ असे फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सय्यद साहिल नजीर शेख यांना मिळालेले बातमीवरुन बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रोड, पुणे येथे इसम नामे शरणप्पा नागाप्पा कटिमणी, वय ३४ वर्षे, रा. आप्पा दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे. मुळ रा. मु.पो. भापर गल्ली, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक. यांच्या ताब्यात एकुण १२,१२,३६०/- रु.कि.चा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच रोक रक्कम इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द फरासखाना पोस्टे गु.र.नं.११८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, मपोउपनि अस्मिता लाड, चेतन गायकवाड, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदिप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे, यांनी केली आहे.




















