पुण्यातली आयटी पार्क परिसर पाण्याखाली… आहे का हे पुण्याला शोभनीय???
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खराडी, लोहगाव खांदवे नगर…व नगर रोड हा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. रस्त्यावरील सर्व वाहने पूर्णपणे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे लाखोंची नुकसान झालेलं आहे.
काही घरांमध्ये, सोसायटीमध्ये पाणी घुसले असून लोकांना गंभीर समस्यांना समोर जावं लागत आहे.
या परिसरातील नैसर्गिक नाल्यांचे, तलावांचे अस्तिवच संपवण्यात आले आहे असे दिसते..
खालील प्रभागातील नागरिक व समाजसेवी संस्थांच्या वतीने अनेक वेळेस आंदोलन करण्यात आले, अधिकाऱ्यानं सोबत चर्चा, निवेदने देण्यात आली, पण फलित अजून काहीच नाही…
सर्वे नंबर 131,132,133 मध्ये मागील कित्येक वर्षां पासून पूर्ण मुळा मूठा नदी पर्यंत वाहणारे नैसर्गिक नाले, बांधकामे करून कायमचेच नाहीसे केले आहेत, त्या मुळेच नैसर्गिक आपत्तीत पावसाचे पाणी हे वस्त्या, घरे, आणि सोसायट्या मध्ये घुसत आहे व नागरिकांचे हाल होत आहेत..
खराडी हे पुण्याचे नावाजलेले आयटी पार्क असून त्या आयटी पार्कमध्ये जर पहिल्या पावसाने ही अशी अवस्था होत असेल तर या अवस्थेमुळे पुणे महानगरपालिकेचा भोंगळा कारभार निदर्शनास येतो.
मे महिन्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर येत्या पावसाळ्यात पुण्याची काय अवस्था होईल…??!
महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या वेळ काढू पणा मुळेच या भागाची भयानक अवस्था आहे…
ह्या संदर्भातील निवेदने उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार, पुण्याचे खासदार श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांना दिलेली असून त्या निवेदनांवर सध्या तरी काहीच कार्यवाही झालेली नाही असे दिसून येते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे इथल्या रहिवाशांना आज अत्यंत धोकादायक जीवन जगावे लागत आहे.
प्रशासनाचे ही नैसर्गिक आपत्ती हाताळण्यास आलेले हे दुर्दैवी अपयशच आहे असेच म्हणावे लागेल…
या संदर्भातला पाठपुरावा वारंवार गेली तीन वर्षे चालू आहे…. सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून संबंधित अभियंता व अधिकारी विविध कारणे सांगून वेळ काढू पणा करत आहेत.
आम्हास आता कायदेशीर मार्गाचा वापर करावा लागणार आहे.- रेसिडेंट्स वेल्फेअर खराडी (KRW) आणि प्रभा करपे फॉउंडेशन याचा पाठपुरावा घेत आहेत…
अध्यक्ष :प्रभा करपे सेक्रेटरी :नताशा नायक
अक्षय पुरे, योगिता अंबाडे, अमोल दळवी, प्रवीण दरेकर,जयेश, राहुल, हरेश चेतवानी, सागर माने, मिलिंद कुलकर्णी व आपले घर सदस्य.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















