दिनांक ११/१२/२०२५ वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या
दि.०४/०७/२०२५ रोजीचे रात्रौ २०.१५ वा चे सुमारास फिर्यादी हे शिंदे वस्ती, हडपसर, पुणे येथे त्यांचे रिक्षामध्ये नातेवाईकांची वाट बघत थांबुन, त्यांनी त्यांचे रिक्षामधील टेप चालु ठेवुन गाणी ऐकत बसलेले असताना त्यांना आरोपी नामे गणेश दिपक आष्टुळ वय २१ वर्षे रा. शिंदेवस्ती, एस.आर.ए.डी. बिल्डींग हडपसर पुणे व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना रिक्षातील साऊंड बंद करण्यास सांगीतले असता, फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्याने नमुद आरोपीतांनी फिर्यादीस लोखंडी कोयते, लाकडी दांडके यानी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले होते, त्यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७३/२०२५ भा.न्या.सं.क. १०९, ११८ (२), १८९(२), १९१(२),१९१(१), १९१(२), १९१(३), १९०, ३५१ (२) (३), ३(५) आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो. अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण सन अधिनियम सन १९९९ चेकलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील इतर आरोपीतांना अटक करण्यात आले असुन नमुद आरोपी नामे गणेश दिपक आष्टुळ हा गुन्हा करुन फरार झाला होता.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी व अंमलदार हे नमुद पाहिजे आरोपीबाबत माहिती काढत असताना पोलीस अंमलदार विष्णु सुतार व विठ्ठल चोरमले यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा सध्या जनता वसाहत शंकर मंदिरजवळ पर्वती पुणे येथे स्वतःचे अस्तीत्व लपवुन वावरत आहे. सदरची बातमी मिळाल्याने मा. वरिष्ठांचे आदेशाने व परवानगीने तात्काळ तपास पथक प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व पोलीस स्टाफ असे जनता वसाहत शंकर मंदिरजवळ पर्वती पुणे येथे जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यास सापळा रचुन अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्यास नाव, पत्ता विचारले असता त्यान त्याचे नाव गणेश दिपक आष्टुळ, वरु २१ वर्षे, रा. एस.आर.ए. सोसायटी, सी. बिल्डींग, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले असुन दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आली आहे.
तसेच सदर आरोपी विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६४४/२ ३० ५०९, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वानवडी श्री. विजयकुमार डोके यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उप-निरिक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड व अर्शद सय्यद यांनी केली आहे.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















