Homeक्राईमहडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणुन मुद्दे‌माल...

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणुन मुद्दे‌माल केला जप्त.

हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणुन मुद्दे‌माल केला जप्त

पुणे शहरात वाढत असलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी विशेष सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले यांनी तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.

त्याअनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथक पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार यांनी वाहनचोरी संबंधित माहिती गोळा करून विविध भागात गस्ती व तपास सुरू केला. दरम्यान पोलीस अंमलदार रविकांत कचरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर पथकाने बार्शी, तुळजापूर, लातुर परिसरात शोध मोहिम राबवून आरोपी नामे रविंद्र शिवाजी घाटे वय ४० वर्ष रा. मु.पो. दहीवाडी, ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव यास ताब्यात घेतले. त्याचेकडे केले तपासामध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुली देवून त्याने चोरी करून नेलेल्या ४ दुचाकी या त्याचेकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीस हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ८०७/२०२५ भा.न्या.सं. क. ३०३ (२) यामध्ये अटक करण्यात आली आहे. तसेच दुसन्या स्वतंत्र तपासामध्ये एक विधीसंघर्षित बालक यास ताब्यात घेवुन त्यांचे कडून १ दुचाकी ही हस्तगत करण्यात आली आहे.

आरोपी तसेच विधीसंघर्षित बालक यांचे कडून हडपसर पोलीस स्टेशन कडील एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले असून ०३,३०,०००/-रु. किं. चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये १ बुलेट, २ होंडा शाईन, २ टिव्हीएस रायडर, अशा ०५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई…

आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील...

सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या

दिनांक ११/१२/२०२५ वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर सहा महिन्यांपासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मुसक्या दि.०४/०७/२०२५ रोजीचे रात्रौ २०.१५ वा...

लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद.

पुणे जिल्हा प्रतिनिधी.  रफीक शेख.  लष्कर पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद दि.२०/११/२०२५ रोजी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोल पंपाचे ऑफिसमध्ये जबदरस्तीने प्रवेश करुन फिर्यादी...

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कष्टकऱ्यांचे आधारवड डॉ. बाबा आढाव यांचे निधन; ९५ व्या वर्षी...

कष्टकऱ्यांच्या बाबांना आज अखेरचा निरोप; मार्केट यार्डमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी, धार्मिक विधीविना अंत्यसंस्कार कष्टकऱ्यांचे नेते, ज्येष्ठ समाजवादी डॉ. बाबा आढाव यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्यावरती...

मुंबई पोलिसांनी २४ लाखांचे चोरीला गेलेले सोने केले हस्तगत…

पुणे जिल्हा प्रतिनिधी.  अब्दुल हन्नान मणियार. मुंबई पोलिसांनी २४ लाखांचे चोरीला गेलेले सोने केले हस्तगत!!! ​मुंबई पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले १००%...

error: Content is protected !!