लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
अवैध हातभट्टी दारुधंद्यांवर कारवाई, १७,७५०/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त.
दि.०७/१२/२०२५ रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांचे पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान त्यांना थेऊर फाट्याजवळ, राखपसरे वस्ती, बेट वस्ती ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी एक महिला या गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायण व इतर साहित्यासह हातभट्टी दारु तयार करत असताना मिळुन आल्या. त्यामुळे लोणी काळभोर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातील हातभट्टी दारु तयार करण्याचे साहित्य व २३५ लीटर हातभट्टी दारुचे तयार रसायण असा एकुण ११,७५०/-रुपये किं.चा माल जप्त केला आहे. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५१/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ फ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
तसेच दि.०७/१२/२०२५ रोजी थेऊर फाट्याजवळ, राखपसरे वस्ती, ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी एक महिला ह्या गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायण व इतर साहित्यासह हातभट्टी दारु तयार करत असताना मिळुन आलेने लोणी काळभोर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातील हातभट्टी वारु तयार करण्याचे साहित्य व १२० लीटर हातभट्टी दारुचे रसायण असा एकुण ६०००/-रुपये किं.चा माल जप्त केला आहे. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सदर महिले विरुध्द गु.र.नं. ५५०/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ फ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे अनुषंगाने मागील अकरा महिन्याचे कालावधीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांनी अवैध दारुधंद्यांवर १०३ कारवाया, अवैध गांजा विक्रीवर १४ कारवाया, अवैध जुगारांवर ३५ कारवाया, अवैध गुठखा विक्री, वाहतुक व साठाधारकावर १ अशा प्रभावी कारवाया केल्या आहेत.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















