खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर
मकोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस केले अटक
खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १४९/२०२४ भा.न्या.सं.क. १०९, १८९(२), १८९ (४), १९१(२) (३) १९०, १२६(२), ३५२, ३५१ (३), आर्म अॅक्ट.का.क. ३ (२५), ४ (२५), म.पो.का.क. ३७ (१) (३), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१), (ii) ३(२) ३(४) अन्वये दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व आंदेकर टोळीचा सदस्य आरोपी नामे पंकज गोरख वाघमारे, वय ३० वर्ष, रा. हडपसर, पुणे. हा मागील दिड वर्षापासून फरार होता. सदर आरोपी हा सध्या जिल्हा कोल्हापूर येथे असल्याची माहिती पोलीस उप-निरीक्षक गौरव देव यांना त्यांचे बातमीदारा मार्फत मिळाल्याने जिल्हा कोल्हापुर येथे जावुन सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाख, श्री.निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील मा. पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार दिलीप गोरे, आझाद पाटील, पवन भोसले, प्रशांत शिंदे व किरण पड्याळ यांनी केली.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















