पुणे जिल्हा प्रतिनिधी. अनस शेख.
*आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणार्या वर केली MPDA कारवाई*
समर्थ पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुंड मंथन सचिन भालेराव वय 19 वर्षे राहणार भवानी पेठ,पुणे याचेवर पुणे पोलीस आयुक्त यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे.
मंथन भालेराव याने आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस त्याचे INSTAGRAM अकाउंट वर ठेवले होते. त्यावेळी तात्काळ समर्थ पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती. Social media च्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांसाठी हा कठोर संदेश माननीय पोलीस आयुक्त यांनी या कारवाई च्या माध्यमातून दिला आहे.
समर्थ पोलीस स्टेशन ची मागील काही महिन्यातील ही पाचवी कारवाई आहे. सदरची कारवाई ही माननीय श्री अमितेश कुमार,पोलीस आयुक्त,पुणे शहर,मा.श्री रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त,मा. श्री राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,मा.श्री कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त परिमंडळ 1,श्रीमती अनुजा देशमाने,सहाय्यक पोलीस आयुक्त,फरासखाना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश गिते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री चेतन मोरे, पोलीस निरीक्षक,गुन्हे, तसेच पो.हवा. प्रसाद दोड्यानूर,पो.हवा जोरकर, वाघेरे,दराडे,शेख समर्थ पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















