पुणे जिल्हा प्रतिनिधी. रफीक शेख.
रेकॉर्डवरील आरोपीस अटक करून १,८०,०००/- रु कि.चा चोरीस गेलेला मुद्देमाल केला हस्तगत!!!
दिनांक १०/१०/२०२५ रोजी फिर्यादी महिला यांनी त्यांची गाडी चोरीस गेलेबाबत दिलेल्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २४३/२०२५ भा.न्या.संक ३०३(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष गायकवाड व विशाल जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, १६ एकर मोकळ्या मैदानात एक इसम चोरीची गाडी घेवून थांबलेला आहे. सदरची माहीती वरिष्ठांना कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जावून बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून बातमीच्या अनुषंगाने खात्री केली असता एक इसम सदर ठिकाणी संशयितरित्या थांबलेला मिळून आला त्याला ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव बाळू प्रभाकर चव्हाण, वय ३८ वर्षे, रा. सदाशिव चाळ, कान्दा मार्केट, जुन्नर एस.टी. स्टॅन्ड समोर, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असल्याची माहिती मिळाली. त्याने त्याचे मौज मजेसाठी व पैश्यासाठी दुचाकी मोटारसायकल चोरलेबाबत सांगितले.
त्याचेकडून बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २४३/२०२५ मधील मोटारसायकल जागीच हस्तगत करण्यात आली. सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने जेजूरी पोलीस स्टेशन हद्दीमधून दोन मोटारसायकल व १० मोबाईल चोरी केल्याचे तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२३/२०२५ भा.न्या.सं.क ३३१ (४), ३०५ मधील घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपीकडून बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २४३/२०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२), तसेच गुन्हा रजि.नं. २२३/२०२५ भा.न्या.सं.क ३३१ (४), ३०५ तसेच जेजूरी पोलीस स्टेशन गु.र..नं. ३७४/२०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२) प्रमाणे गुन्हे उघडकीस आणून त्याचेकडून एकुण १,८०,०००/- रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे, यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संजय आग्रे, आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित ताकपिरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे व राहूल खाडे यांनी केली आहे.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















