युनिट ०३, गुन्हे शाखा, पुणे शहर
रेकॉर्डवरील आरोपीतास ०१ गावठी पिस्टल ०२ जिवंत काडतुसासह केले जेरबंद
दिनांक २८/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ चे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार नितिन जगदाळे व तुषार किंद्रे असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे येथे आले असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे व नितीन जगदाळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पर्वती कैनाल रोड येथे एक इसम पिस्टल घेवून थांबलेला आहे. सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता एक इसम संशयितरित्या थांबलेला मिळून आला. त्याला स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव नरेंद्र महादेव बलकवडे वय ३५ वर्ष रा. स नं २०२०/५ चाळ नंबर ०७, एरंडवणे, मेहंदळे गॅरेज पुणे-०४ असे सांगितले. सदरवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुस मिळून आले सदर इसमास पुढील कारवाईकरीता पर्वती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर इसमाविरुद्ध यापुर्वी अलंकार पोलीस स्टेशन येथे ०६ गुन्हे व कोथरुड पोलीस स्टेशन येथे ०३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१. पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री संपतराव राऊत यांचे सुचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार अमित बोडरे, नितीन जगदाळे व तुषार किंद्रे यांनी केलेली आहे.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















