पुणे जिल्हा प्रतिनिधी. रफीक शेख.
बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणा-या ०२ युवककांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन १,०८,८००/-रु. किं. चा नायलॉन मांजा केला जप्त
दिनांक १९/११/२०२५ रोजी मुंढवा पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश राऊत यांना त्यांचे गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळली की, हडपसर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन इसम नायलॉन मांजा त्यांचे ओळखीचे लोकांना विक्री करण्यासाठी येणार आहेत. सदर बातमीचे अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवुन सदर ठिकाणी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचे मदतीने छापा कारवाई केली असता सदर वेळी इसम नामे १) आयुष राहुल शिदे, वय २० वर्षे, रा. ससाणेनगर, अरीहंत रेसीडेन्सी, शिंदे निवास, हडपसर, पुणे २) यशराज विजय दिवेकर, वय २० वर्षे, रा. हिंगणे मळा, भैरवनाथ मंदीराजवळ, हडपसर, पुणे यांचे ताब्यातुन १,०८,८००/-रु.कि.चे, मोनो फिलगोल्ड कंपनीचे नायलॉन मांज्याचे रिल असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला. तसेच वरील दोन्ही आरोपीविरुध्द मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१३/२०२५ भा.न्या.सं.क. २२३, ३(५) व पर्यावरण संरक्षण कायदा क. ५.१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण करीत आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ५. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्रीमती अनुराधा उद्द्मले यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस उप-निरीक्षक युवराज पोमण, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, योगेश गायकवाड योगेश राऊत, रुपेश तोडेकर व स्वप्नील रासकर यांचे पथकाने केली.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















