सराईत गुन्हेगारांकडून १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस केले हस्तगत.
दि.०८/११/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर हे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोंबीग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार सुरेद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे. चैतन्य बैरागी हा निलायम ओव्हर ब्रिज जवळ उभा असून त्याचेजवळ पिस्टल आहे. सदर बातमी मिळताच तात्काळ पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता रेकॉर्डवरील आरोपी नामे. चैतन्य बैरागी व एक इसम मोहम्मद ऑटो गॅरेज, निलायम ब्रिज जवळ फुटपाथवर थांबला असल्याचे दिसून आले असता लागलीच सदर दोन्ही आरोपीस ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचाराला असता, त्यांने त्यांचे नाव १) चैतन्य संतोष बैरागी, वय २३ वर्षे रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुण. २) ऋषीकेश फुलचंद रवेलीया, वय २२ वर्षे, रा.लेन नं. ४, साठेवस्ती, लोहगाव, पुणे. असे सांगीतले. तसेच सदर आरोपी क्र.१ ची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल १ जिवंत काडतूस मिळून आले असता ते जप्त करण्यात आले. सदर बाबत पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३४३/२०२५, आर्म अॅक्ट का. क. ३, २५, भा.न्या.सं.क. ३(५) व म.पो.का.क. ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींकडे अधिक तपास केला असता आरोपी क्र.०१ याचेवर फरासखाना पो.स्टे व पर्वती पो.स्टे. येथे एकुण २ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र.०२ याचेवर मोका सारखे गंभीर गुन्हे दाखल असून फरासखाना पो. स्टे व विमानतळ पो.स्टे. येथे एकुण ३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर, कडील. मा. पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, अमोल राऊत, रविंद्र रोकडे, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, पवन भोसले, गणेश खरात, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, शेखर खराडे, चेतन आपटे व किरण पडयाळ यांनी केली.


















