घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीतास अग्निशस्त्र व जिवंत काडतूसास, ताब्यात घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस…
गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथक वरीष्ठांचे सुचनांप्रमाणे घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड करण्याचे अनुशंगाने हडपसर परिसरातील आरोपींवर लक्ष ठेवुन असताना दि. ०८/११/२०२५ रोजी यूनिट ६ कडील पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली कि, घरफोडी करणारा सराईत आरोपी नामे हंसराज सिंग उर्फ हँसू रणजित सिंग टाक, वय १९ वर्षे, रा. तळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे हा त्याचे राहत्या परिसरात आला आहे. सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे व युनिट ६ कडील पथक असे रवाना होवुन, सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. दोन पंचासमक्ष नमुद आरोपीची घर झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, एक रिकामी मॅगजीन व एक जिवंत काडतूस ४१४००/-रु.कि.वा. व वेगवेगळ्या वर्णनाचे १५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने १७,८१,०००/- रू. कि.चे. असा एकुण १८.२२.२००/- रु.किं.चा. मुद्देमाल मिळून आलेला आहे. नमूद आरोपीता विरुद्ध हडपसर पो. स्टे. येथे गु.र.नं.९५४/२०२५, भा.ह.का. कलम ३ (२५) सह म.पो.का. ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीताचे ताब्यातील मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत आरोपीताकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याचा खालील नमुद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे ०३-
१) सहकारनगर पो. स्टे. गु.र.क्रं. २८६/२५, मा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(४). ३(५)
२) चिखली पो.स्टे.गु.र.क्र.६१५/२५, भा.न्या.सं. कलम ३३१(३) (४), ३०५
३ ) भोसरी एम.आय.डी.सी.पो. स्टे. गु.र.क्र.६१०/२५, भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३०५
नमुद आरोपीतास वरिष्ठांच्या परवानगीने पुढील कायदेशीर कारवाई कामी हडपसर पो. स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ कडील सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन घाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, म.पो.अं. प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली


















