पुणे जिल्हा प्रतिनिधी. हर्षल मुथा .
येवलेवाडी हद्दी मध्ये सर्वे नंबर ३३/३ अ मधील श्री. कमलेश रतीलाल ओस्तवाल यांच्या मालकिच्या जागे मध्ये
आज सकाळी १०.३० ते ११.३० च्या सुमारास १० ते १५ हत्यारबंद लोकं व JCB घेऊन त्यांचे पत्र्याचे कंपाऊंड पडण्यासाठी व ताबा घेण्यासाठी आले होते.
सदर जागेचा वाद हा मा. सिव्हिल कोर्ट, पुणे येथे दाखल असूनही श्री. शुभम सुनील बनसोडे, सुनील मरिना बनसोडे व इतर हे ह्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर जागेमधील भाडेकरूंना २ दिवसांपूर्वी श्री. सुनील बनसोडे, राहुल कुऱ्हाडे व इतर ह्यांनी, *’ही जागा खाली कर, अन्यथा जीवाचे बरेवाईट होईल’* असे धमकावले होते. त्यांच्या नावे कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये काल तक्रारी अर्ज सौ. आरती बागडी यांनी दाखल केला आहे.
सौ. आरती बागडी ह्यांनी सांगितले की, ’दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी १ ते १.३० सुमारास महावितरणचा एक अधिकारी व त्याच्यासोबत तीन ते चार अनोळखी इसम यांनी राहत्या घरामध्ये असलेले वीज कनेक्शन कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देता बाहेरूनच बाहेर कापली व वीज कनेक्शन बंद केले. सदरची कापलेली वायर ही आमच्या राहत्या जागेस असलेल्या पत्रा कंपनीला चिकटल्यामुळे त्यामध्ये वीज प्रवाह चालू असल्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण केला. परंतु सदरची बाब लक्षात आल्यामुळे आम्ही त्वरित ती वायर दूर केली व जीवितहानी टाळली, वीज नसल्याने CCTV कॅमेरे व घरातील वीज बंद झाली त्यामुळे खूप अडचण झाली. महावितरण च्या अधिकाऱ्यांना फोन वरून बऱ्याच विनंत्या केल्या पण काही उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही बॅटरी बॅकअप वापरून वीज सुरू केली.’
जागेमध्ये राहणारे भाडेकरू व मालक ह्यांच्या जीवितास धोका असल्यामुळे त्यांनी आज कोंढवा पोलिस मध्ये रीतसर तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
जागा मालक श्री. कमलेश ओस्तवाल ह्यांनी सांगितल्या प्रमाणे, सदर विषयात DCP राजकुमार शिंदे साहेब, वानवडी कोंढवा विभाग ह्यांनी कोंढवा पोलिस वरिष्ठ निरीक्षक श्री. विनय पाटणकर साहेब व पोलिस निरीक्षक गुन्हे श्री. नवनाथ जगताप साहेब ह्यांना सूचित केल्यानुसार, सदर विषय जागेचा असल्यामुळे, सिव्हिल कोर्ट मध्ये पाठवण्यात यावा, असे जून महिन्यातच कळवले होते. तरी बनसोडे व इतर हे बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज ही घटना घडत असताना, कोंढवा पोलिसांना पाचारण करण्यात आले व त्यांनी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्देश दिले आहेत, असे सौ. आरती बागडी यांनी सांगितले.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















