आंदेकर टोळीवर गुन्हे शाखेची धडक कारवाई
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १४९/२०२४ भा.न्या. सं. क. १०९,१८९ (२),१८९ (४), १९१(२) (३),१९०,१२६ (२), ३५२,३५१ (३), भारतीय शस्त्र अधि. कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (३), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कल ३(१), (ii) ३ (२) ३ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व आंदेकर टोळीचा 1/2 गणेश उर्फ सुरज अशोक वड़ा, वय ३० वर्ष रा. मंगळवार पेठ पुणे हा मागील दोन फ होता. सदर आरोपी हा सध्या मु.पो. कुरता. भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार दिलीप गोरे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत मिळाल्याने जिल्हा कोल्हापुर येथे जावुन सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच दि.१५/१२/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल आव्हाड व पोलीस अंमलदार मयुर भोकरे यांना त्यांचे गोपनीय बतमीदाराकडुन माहिती मिळाली की, आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक रा. नानापेठ पुणे याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आहे. तन्मय कांबळे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने गावठी पिस्टल हे त्याचा मित्र विधीसंघर्षग्रस्त बालक रा. नानापेठ पुणे याचेकडे ठेवल्याचे सांगुन तो सध्या स.नं. २८, डोके तालीमच्या मागे, नाना पेठ, पुणे येथील बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर याच्या ” हिच आईची इच्छा” या चार मजली घरामध्ये राहत असल्याचे सांगितले. गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विधीसंघर्षग्रस्त बालक रा. नानापेठ पुणे यास पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेवुन त्याचेकडे विश्वासात घेवुन चौकशी करीता त्याचे ताब्यातील होडा अॅक्टीव्हा मोपेड स्कुटरचे डिकीत ८०,०००/-रु.कि.चे ०२ गावठी बनावटीचे पिस्टल, २०००/-रु.कि. एक लोखंडी धारदार कुकरी, १५,०००/-रु.कि. एक काळया रंगाचे एअर पिस्टल, ४०,०००/- रु.कि. एक होडा अॅक्टीव्हा मोपेड स्कुटर व इतर ऐवज असा एकुण १,३७,५००/- रु.चा. मुद्देमाल मिळुन आला.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















