पुण्यात आर्मीच्या विंग कमांडरच्या बंगल्यावर मोठा दरोडा; 40 तोळे सोन्यांसह कॅशही चोरीला, शहरात खळबळ
पुण्यात जांभुळकर चौकात विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरी दरोडा पडला. दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून 40 तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख रक्कम लुटली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून, पोलीस कसून तपास करत आहेत.
पुणे पुण्यात मागील काही दिवसांपासून चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीये. पुण्यातील जांभुळकर चौकात लष्कराच्या विंग कमांडर च्या घरावर पहाटे दरोडा पडलाय. यावेळी चोरांनी धमकावत मोठी रक्कम आणि सोन्यावर डल्ला मारला. विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरात घुसून दरोडेखोराने 40 तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख रक्कम पळवली. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास जांभुळकर चौकात असलेल्या कौशल्या बंगल्यामध्ये ही घटना घडलीये.
मुख्य संपादक:- इरफान शेख



















